2+टी डे सेटलमेंट काय असते ? जाणून घ्या

आपण शेअर जेंव्हा खरेदी करतो तेंव्हा पैसे आपल्या डिमॅट अकाउंट मधून कमी होतात आणि शेअर आपल्या खात्यात जमा होतात याचाच अर्थ असा की आपण त्या पैशाच्या मोबदल्यात शेअर घेतले आता एक वेळ आली जेंव्हा आपल्याला ते विकायचेत तेंव्हा आपण विकणार पण ते पैसे लगेच आपल्या डिमॅट किंवा बँक खात्यात येणार नाहीत  यासाठी टी + २ सेटलमेंट सायकल आहे.

 

टी म्हणजे ट्रेड ज्या दिवशी केला तो दिवस. त्यानंतर दोन दिवसांनी ब्रोकरकडे विकलेल्या शेअरची रक्कम येते किंवा शेअर खरेदी केले असतील तर, ब्रोकरकडे ते येतात. साधारण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रक्कम आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होते आणि घेतलेले शेअर डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. ज्या दिवशी व्यवहार होतो, त्याच दिवशी रात्री इमेलने काँट्रॅक्ट नोट आपल्याला मिळते. जर त्याची हार्ड कॉपी (कागदोपत्री) हवी असेल तर, तीसुद्धा मिळू शकते. यात दिलेला व्यवहाराचा तपशील अचूक आहे याची अवश्य खात्री करून घ्यावी. कारण हे एक लिगल डॉक्युमेंट आहे. तसेच आयकर विभागाने विचारले तर, त्यांना दाखवण्यासाठी काँट्रॅक्ट नोट जपून ठेवणे आवश्यक असते. याशिवाय डिमॅट अकाउंटमधील बॅलन्सही नियमित कालावधीने तपासणे आवश्यक असते.

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म