समस्याग्रस्त सेक्टर(Problematic sector)

एक असे सेक्टर ज्यात गुतंवणूक करणे खूपच धोकादायक आहे तसे तर हे सेक्अटर जुने आहे यात गुंतवणूक करणारेही जास्सेत आहे पण जसकी मी आपल्याला म्हणालो कि हे सेक्टर खूपच धोकादायक आहे . कोणते आहे  सेक्टर  जे खरच इतक आवघड आहे त्याचा अंदाज घेणेदेखील आपल्या खिशाला चांगलेच कात्री लाऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात या पोस्ट मध्ये .

रिअल इस्टेट व हाऊसिंग सेक्टर, हा एक वेगळा सेक्टर म्हणता येईल किंवा यालाच बांधकामक्षेत्रातील एक उपप्रकार म्हणूनही त्याला गणता येईल. या सेक्टरमध्ये मुख्यतः घरबांधणी क्षेत्रातील व बांधकाम क्षेत्रातील कंपन्या येतात. दिल्लीची डीएलएफ लिमिटेड आणि अन्सल हाऊसिंग, मुंबईच्या एचडीआयएल आणि लोक हाऊसिंग, पुण्याची कोलते पाटील अशा अनेक कंपन्या येतात. एकेकाळी या कंपन्यांची शेअरबाजारात खूप चलती होती. २००७च्या अमेरिकेतील सबप्राइम घोटाळ्यानंतर मार्केटमध्ये मंदी आली, त्यात या कंपन्यांच्या शेअरचेही भाव खाली आले. त्याच वेळी या क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, हे लक्षात आले.



1980च्या दशकापूर्वी देशाला रिअल इस्टेट मार्केटमध्ये फारसा अनुभव आला नव्हता. ... देशातील निवासी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 1970 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी विकास कंपनी, 1971 मध्ये शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ तसेच 1988 मध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण बँक स्थापन केली.


 

. घरांच्या किमती भयानक वाढलेल्या आहेत, त्यांची विक्री होत नाही. या कंपन्यांना बँका सहजासहजी कर्जे देत नाहीत किंवा मधेच त्यावर नियंत्रण आणले जाते. मग त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. प्रमोटरना आपले शेअर गहाण ठेवावे लागतात. त्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण होतात. मुख्य मुद्दा हा आहे, यांच्या कारभारात पारदर्शकता नसते. जमिनीचे मूल्यांकन कसे केले जाते, ताळेबंदात कसे घेतले जाते हेदेखील मुद्दे त्यात आहेत.

 परदेशी गुंतवणूक संस्था, देशी वित्त संस्था अशा सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सहसा गुंतवणूक करत नाही, त्यामुळेही यांचे भाव वर जात नाहीत. 

एचडीआयएलच्या शेअरचा भाव मार्च २०११ मध्ये १६१ रुपये होता, तो तीन वर्षांनंतर मार्च २०१४ मध्ये ४९ रुपये होता आणि १५ नोव्हेंबर २०१९ला तर तो २.३० रुपये होता. पीएमसी बँकेच्या कर्ज घोटाळ्यात अडकल्याने एचडिआयएलच्या संचालकांना ऑक्टोबर २०१९ मध्ये अटक झालेली आहे. डीएलएफच्या शेअरचा भाव तीन वर्षांपूर्वी मार्च २०११ मध्ये २३४ रुपये होता. ५ नोव्हेंबर २०१९ला २१२ रुपये होता, म्हणजे यातून गुंतवणूकदारांना काहीच फायदा झालेला नाही.

 या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समधून फायदा मिळवण्यासाठी, त्यांच्या बॅलन्स शीटचा तपशीलवार व व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे. नव्या गुंतवणूकदारांना ते शक्य नसल्याने त्यांनी या सेक्टरपासून दूर राहावे. ह्या क्षेत्रात काही प्रमाणात रोख रकमेचे व्यवहार होतात, त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ला नोटबंदी (डिमॉनिटायझेशन) केले, त्याचा फटका ह्या क्षेत्राला बसला. तसेच नवे रेरा नियम यामुळेही मोठ्या व चांगल्या कंपन्याच तग धरतील.




या सेक्टरचे मोठे भावंड म्हणजे पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि त्याच बरोबरीने कन्स्ट्रक्शन अँड काँट्रॅक्टिंग (सिव्हिल वर्क) सेक्टर. यातील एल अँड टी लिमिटेड ही कंपनी आधी बाजूला काढू. 

देशाला अभिमान वाटेल अशीच ही कंपनी आहे आणि तिच्या गुंतवणुकीमधून बहुधा आजवर फायदाच मिळालेला आहे. परंतु या सेक्टरमधील लँको इन्फ्रा, जीएमआर, आयव्हीआरसीएल, बीएल कश्यप, एचसीसी, पुंज लॉइड अशा कित्येक कंपन्यांनी मात्र गुंतवणूकदारांना खूपच मार दिलेला आहे. याची कारणेही तशीच आहेत. भारत वेगवान प्रगती करतो आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांची प्रचंड कामे या कंपन्यांना मिळणार इत्यादी खूप मोठमोठ्या गोष्टी (बाता!) येत गेल्या. नंतर त्यातले खाचखळगे लक्षात आले की, नॅशनल हायवे, बंदरे, विमानतळ, वीजकेंद्रे, सेझ प्रकल्प सगळे बांधायचे आहेत, पण भूसंपादन, स्थानिक लोकांचा विरोध, प्रकल्प रद्द होणे किंवा खूप विलंब होणे, पर्यावरण खात्याकडून मंजुरी न मिळणे, खर्चात वाढ होणे, चढ्या व्याजदराने कर्ज अशा अनंत समस्या या सेक्टरमध्ये आहेत. शिवाय लँको कंपनीला परदेशात कोर्टबाजीचा फटका बसला तर जीएमआरचे परदेशातील विमानतळ बांधणीचे कंत्राट रद्द झाले अशाही समस्या आहेत. 

सरकारच्या मनात खूप काही आहे, पण धोरणात धरसोड वृत्ती आहे, अंमलबजावणीच्या पातळीवर अपयश यामुळे विकासाचे घोडे मागे राहते. नेक्स्ट एल अँड टी म्हणून पुंज लॉइडचे नाव घेतले गेले होते आणि नंतर तो एल अँड टीच्या कुठे आसपासही दिसला नाही. अशा आणखीही काही कंपन्या या सेक्टरमध्ये आहेत. म्हणूनच जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

टेक्सटाइल्स म्हणजे वस्त्रोद्योग हाही धोकादायक सेक्टर होता. या सेक्टरमधील सेंचुरी एका आणि सेंचुरी टेक्सटाइल्स कंपन्या एकेकाळी शेअर मार्केटच्या डार्लिंग कंपन्या होत्या. गिरणीकामगारांच्या संपानंतर या क्षेत्राची पीछेहाट झाली. कंपन्यांची उत्पादनक्षमता खूप वाढलेली, पण तिचा पूर्ण वापर नाही, त्यात मागणी कमी, निर्यातीमध्ये स्पर्धा अशी काही कारणे देखील त्यात होती. असंघटित क्षेत्रात खूप उत्पादन आहे, त्याचीही स्पर्धा आहे. पण ह्यात आता काही सुधारणा झालेली आहे. ह्याच सेक्टरमध्ये ग्रासीम, रेमंड, लक्स इंडस्टीज अशा अनेक चांगल्या कंपन्याही आहेत.

बल्लारपूर इंडस्ट्रीज, जेके पेपर लिमिटेड, वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड इत्यादी कागदाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या पेपर सेक्टरमध्ये येतात. याही सेक्टरकडून बहुधा निराशा अनुभवायला येते. तथापि प्लॅस्टीक बंदीनंतर ह्या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. याचाच अर्थ अशी संधी कुठे निर्माण होते यावरही लक्ष हवे.

असे असले तरी, वरील सर्वच सेक्टरमधील काही कंपन्यांत गुंतवणूक करून भरघोस रिटर्न मिळू शकते. मात्र त्यासाठी आपण तशा प्रकारचे खूप जोखीम घेणारे गुंतवणूकदार असणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये नवीनच सुरुवात करताना, अनुभव नसताना इतकी जास्त जोखीम घेऊ नये, आणि सेफ गेम खेळणे हे धोरण ठेवावे, हा दृष्टिकोण ठेवून हे विवेचन केलेले आहे. एकदा का तुम्हाला मार्केटमधील बारकावे कळायला लागले, धोका घेण्याची तुमची क्षमता वाढली की मग या सेक्टरचा विचार करावा.

शेवटी एकच सांगेन, कि या सेक्टर मध्ये जितका पैसा आहे, तितकाच धोकाही आहे, त्यामुळे अशा धोकादायक क्षेत्रात पैसे गुंतवणे फायद्याचे नाही.आणि समजदारपणा यातच आहे कि या क्षेत्रापासून दूर  राहावे.

आपल्याला या क्षेत्राबादल काय वाटते नक्की  हा लेख कसा वाटला नक्की सांगा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचू शकेल.



Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म