सरकारी हस्तक्षेप खूप असलेले सेक्टर (A sector with a lot of government intervention)

 

प्रत्येक सेक्टर जाणून घेणे किती महत्वाचे हे आपल्याला हा लेख वाचल्यानंतर समजेलच सरकारी (government) हस्तक्षेप असलेले खूप सारे सेक्टर धोकादायक आहेत आणि ते कसे हे समजून घेण्यासाठी आपण हा लेख वाचा .

एकाच सेक्टरमधील वेगवेगळ्या कंपन्यांची व्यावसायिक कामगिरी वेगवेगळी असू शकते, व त्यानुसार त्या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणारे रिटर्नही वेगवेगळे असतात, हे पहिले आपण समझुन घ्यायला पाहिजे नाहीतर चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला भारी नुकसान  होऊ शकते.

तथापि काही सेक्टर असे आहेत, ज्यातील कंपन्यांचे शेअर घेताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सेक्टर हा विषय अजेंड्यावर घेण्याचे कारणच, अशा काही सेक्टरकडे नजर टाकणे हा आहे. साधारणपणे सरकारी(government)हस्तक्षेप खूप असलेले, सरकारी नियंत्रण असलेले, सरकार(government)च्या धरसोड धोरणामुळे परिणाम होणारे सेक्टर, हे जास्त जोखीम असलेले असतात. त्यातील पहिलेच उदाहरण आहे, ते शुगर सेक्टर अर्थात साखर उत्पादन क्षेत्राचे. 

आपल्या महाराष्ट्रात बहुसंख्य साखर कारखाने, सहकारी क्षेत्रात आहेत किंवा राजकीय नेत्यांनी सार्वजनिक भांडवलातून ते खाजगी क्षेत्रात सुरू केलेले आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि इतर काही ठिकाणी साखर उत्पादक कंपन्या, या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत आणि त्यांच्या शेअरचे खरेदी-विक्रीचे व्यवहार स्टॉक एक्सचेंजवर होत असतात. बजाज हिंदुस्थान ही यातील एक मोठी कंपनी तर श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी, बन्नारी अमन, आंध्रा शुगर्स इत्यादीही काही मोठ्या व छोट्या कंपन्या या क्षेत्रात आहेत.




 या क्षेत्रात सरकार(goverment)चा हस्तक्षेप कसा असतो बघा :

 साखरेचे उत्पादन कमी झाले की साखरेचे भाव वाढतात, अशावेळी सरकार साखरेवर निर्यातबंदी घालते, साखर आयात करते आणि भाव वर जाऊ देत नाही. सणाच्या वेळी तर साखरेचे भाव वाढणे म्हणजे लोकांची नाराजी आणि विरोधी पक्षाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे. दुसरीकडे साखर उत्पादक कंपन्यांसाठी ऊस हा कच्चा माल. उसाच्या किमतीवरही सरकारचे नियंत्रण असते. कारण शेतकरीवर्गाला दुखावून चालत नाही. म्हणजे एका बाजूला या कंपन्यांच्या उत्पादनाच्या किमतीवर बंधन, शिवाय कच्च्या मालाच्या किमतीही सरकार(government) च्या हातात. त्यात आता आर्थिक उदारीकरणाच्या काळात सरकारला यातून बाहेर पडायचे आहे, निदान तसा सरकार (government) च प्रयत्न असतो. त्यामुळे साखर पूर्णपणे नियंत्रणमुक्त होणार, अशा बातम्या येत राहतात. या क्षेत्रातील कंपन्यांचे भाव वाढतात. थोड्या दिवसांनी काहीच होत नाही, हे बघून भाव पुन्हा खाली येतात. ह्या सापळ्यात आपण गुंतवणूकदारांनी अडकू नये.


या सेक्टरप्रमाणेच फर्टिलायझर (खते) हाही सरकारचे जास्त नियंत्रण असलेला सेक्टर आहे. त्यातूनही गुंतवणूकदारांना फार फायदा मिळालेला नाही.

शेवटी एवढेच सांगतो कि आपल्याला खूप सावधानपूर्वक गुंतवणूक करायला पाहिजे आपला पैसा आणि वेळ दोन्ही  किमती आहेत.त्यामुळे पुढे आपल्याला फायदा होईल अधिक लाभ हा अधिकच धोकादायक ठरू शकतो हे नक्की म्हणून योग्य सेक्टर निवडणे तितकेच महत्वाचे ठरते.

या सेक्टर बद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा 




Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म