बाइनरी ट्रेडिंग काय आहे ?(what is binary trading ?)

जर आपण शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर आपण हा प्रकार पाहिला नसेल किंवा हा प्रकार ऐकला नसेल , आहेत बाइनरी ट्रेडिंग .शेअरमार्केट मध्ये मुख्यता काय होते. शेअर मार्केटमध्ये  आपण शेअर घेतो आणि विकतो परंतु बायनरी ट्रेडिंगमध्ये असे होत नाही तर जाणून घेऊया कि हि बायनरी ट्रेडिंग शेवटी काय आहे काम कसे करते आणि आपले कष्टाचे पैसे इथे लावणे किती योग्य आहे ते .


बायनरी(binary)मार्केट आणि क्रिप्टो मार्केट मधील फरक समजून गेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 





जस कि आपण शेअर मार्केट मध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अनेक कंपन्यांचे शेअर मिळतील जे आपण खरेदी आणि विक्री करून नफा कमावला जाऊ शकतो आणि असा मुनाफा  फायद्याचासुद्धा आहे.पण यापेक्षाही अधिक मुनाफा मिळवून देण्याचे आमिष दाखून लोकांचे पैसे मिनिटात उडवणारे काही बायनरी अप्प चुकीच्या पद्धतीने गुगल प्लेवर आले आहेत.मी मानतो कि सध्या क्रिप्टो चलन बाजारात प्रसिद्ध झाले आहे आणि हे हि जाणतो कि हे खरेदेखील आहे पण क्रिप्टो चलन आणि बायनरी ट्रेड यांचा दूरदूर पर्यंत संबंध नाही हेही मी आपल्याला दाखून देईल.

 मार्केट २४ तास चालू 

आपल्या शेअर मार्केटमध्ये आपण जसे पाहतो कि सकाळी 9 वाजता आपले मार्केट सुरु होते आणि जवळपास 15:30 ला पूर्ण मार्केट संपते माझ्या अनुभवानुसार सांगतो कि आपले शेअर मार्केट खूप सुरक्षित आहे .इतर कोणत्याही मार्केटच्या तुलनेत आपण पहा कि बायनरी ट्रेडिंग २४ तास चालू असल्याचे दाखवले जाते आणि ते खरे असेलही पण खरच कमालीची गोष्ट आहे कि हे मार्केट आपण इथे २४ तास पैसे  लाऊ शकतो .  
    

 गुगल प्लेवरही उपलब्ध आहेत हे अप्प 



 शेअर मार्केट संबंधीचे अनेक अप्प आपल्याला गुगल प्लेवर मिळतील आणि ते सुरक्षित आहेत यात शंका नाही. पण याच बरोबर बायनरी मार्केटवर चालणारे अनेक अप्प आपल्याला गुगल प्ले वर मिळतील आणि हेच समस्याचे कारण आहे हे अप्प किती सुरक्षित आहेत याबद्दल मी आजही साशंक आहे.या मार्केट विषयी कोणतीही माहिती आपल्याला कुठेच मिळणार नाही त्याच बरोबर याचा विस्तारक असा अभ्यासही नाही यावर मी एकच सांगू इच्छितो कि हे एका नव्या ट्रेडर साठी फक्त एका मटक्याच्या डावासारखे आहे. जिथे फक्त अंदाज बांधता येतील पण निर्णय चुकीचा का बरोबर हे सांगणे खूपच आवघड जिथे नुकसान हमखास होईल असे मला वाटते  पण असे का ? हे आपण पुढे समजून घेऊ.

" बाइनरी ट्रेडिंग ला FIX ट्रेड असेही म्हणतात इथे लिमिटेड वेळासाठी ट्रेड घेता येतो  जसे की पाच मिनिट दोन मिनिट एक मिनिट किंवा तीन मिनिट किंवा दहा मिनिट किंवा अर्धा तास किंवा एक तास जेव्हा आपण असा एक हजार ज्यामध्ये आपण करतो आणि त्यानंतर आपल्याला तो वेळ बदलता येत नाही आणि तो क्लोज करता येत नाही तो ट्रेड त्यात वेळ होईल तेव्हा त्याचा टाईम संपेल याचा अर्थ असा जरी आपल्या बाजूने कौल दाखवत असेल तरीही आपल्याला ना इलाजाने थांबावे लागेल आणि स्वतःचे नुकसान करून घ्यावे लागेल"

 

मुलभूत पाया नाही 

कोणत्याही कंपनीचा शेअर  हा विक्रीसाठी जेंव्हा येतो त्याला काहीतरी मुलभूत पाया असतो आणि त्यानुसार तो बाजारात चढ उतार पाहत तो गुंतवणूकदाराना फायदा किंवा तोटा देतो. जसे कि टा टा मोटर ज्या कंपनीचे उत्पादन बाजारात आपण सर्रास पाहू शकतो अनेक मोटरगाड्या आपल्याला दिसतील. ज्यांच्या विक्रीवरच टा टा  मोटरचे शेअर्स मार्केटमध्ये चढ उतार  आपण  पाहतो . असेच चढ आणि उतार इतरही कंपन्यासोबत होत असते.पण इथे असे आपल्याला पाहायला मिळत नाही कारण  ग्राफ खाली आणि वर कश्याच्या भरवश्यावर जातो हेच मला समजले  नाही ना यांचे प्रोडक्ट मार्केट मध्ये आहे ना हा ग्राफ कुणाला फायदा मिळून देतो यावर माझे मत स्पष्ट आहे कि एक किंवा दोन मिनिटात कसा अंदाज बांधायचा कि हे आपण ट्रेड जिंकणार कि हरणार  आपल्याला जी पद्धत यांनी देऊ केली आहे हि समजन्यासारखी नाहीच शेअर मार्केट इतके सोपे असते ट्रेड करणे इतके सोपे असते तर भारतात प्रत्येकजण श्रीमंत झाला असता या अप्प मध्ये स्तीरता नही आणि याचा भरवसाही नाही ज्यामुळे विश्वास थोडा कमीच होतो.क्रिप्टो चलन एक वेगळी बाब आहे इथे आपल्याला नेहमी चढ उतार पाहायला मिळतील पण ते मिनिटात होणारे बदल नसतात. 


मार्केट खूप जुने साल्याचा दावा 

बायनरी मार्केट ट्रस्टेड आहे  असा हे अप्प ब्रोकर दावा करतात यांचे संघटन देखील आहे जे यांना प्रमाणित करण्याचा दावा करते. पण मला एक सांगा लॉक डाऊन आधी किती जणांना हे माहित होते कि तुम्ही १००  रु एक  मिनिट लावून २०० रु कमावू शकता इतक सोप आहे का कमावण यापुर्वीही अशा अप्प गुगल प्ले वर आल्या होत्या ज्या भारतीय सरकारच्या आदेशानुसार गुगल प्ले वरून काढण्यात आल्या. होत्या आणि आता पुन्हा त्या गुगल प्ले वर आल्या आहे यात बर्याच अप्प चीनी आहेत.या जुन्या नाही तर नव्या आहेत स्वतःला ट्रस्टेड समजणाऱ्या या कंपन्या धोकादायक आहेत.


सरकारची मान्यता नाही 

मी मानतो कि क्रिप्टो चलनालादेखील भारतात मिश्र प्रतिसाद आहे. पण यापूर्वी बायनरी मार्केट वर भारत सरकारने प्रतिबंध लावला होता आणि आता नवे बदलून याच कंपन्या पुन्हा पाय रोवत आहेत . तितकेच खरे हेही आहे कि त्यांना सरकारी मान्यता नही तुलनेत क्रिप्टो चलन सेफ आहे कारण याच्यापासून नफा मिळण्याचे अनेक किस्से आहेत .त्याचबरोबर अनेक देशातील अनेक कंपन्या क्रिप्टो चलनाला  स्वीकारतात .


एका मिनिटात फैसला 



आपल्याला नफा होईल कि तोटा हे एका मिनिटात ओळखणे सोपे नाही पण या अप्प आपल्याला असा ग्राफ दाखवतात ज्याला पाहून आपल्याला वाटते कि मी एका मिनिटात हजारो रुपये कमवीन पण हे कसे शक्य होऊ शकते.जिथे ५०० रु वाढ होण्यासाठी दिवस भर डोळे खपवत मार्केट पाहूनही तितकासा मुनाफा होत नाही पण इथे एका मिनिटात ५०० लावले तर १००० रु होतील.  खर वाटत नाही .


डेमो खात्यात जिंकणार पण खरे पैसे हरणार 

माझ्या अनुभवानुसार आपल्याला एक सांगतो हि फक्त एक फसवणूक आहे यापेक्षा काही नाही कारण आपण डेमो खात्यात तर जिंकणार पण खरे पैसे इथे हरणार. डेमो मध्ये पैसे जिंकल्यावर आपल्याला असे वाटेल कि आपण इथून लाखो नेऊ तर आपण चुकीचे  आहात इथून आपण एक रुपयाही नेऊ शकणार नाहीत पहिले काही ट्रेड आपल्याला हे अप्प जिंकू देते पण शेवटी सर्व पैसे घेऊन जाते.



एकदा पैसे लावल्यावर कोणताही पर्याय नाही 

इथे आपण एकदा एक मिनिटाचा ट्रेड घेतला कि आपल्याला कोणत्याही पद्धतीने त्याला थांबवण्याचा पर्याय उपलब्ध नाही आपले पैसे हे जाणारच .

पैसे काढण्यास प्रोब्लेम 



खूप वेळा असेदेखील झाले कि या अप्पनी युजरचे खाते  फ्रीज केले आणि तेही कोणत्याही  कारणाशिवाय आता ते असे का करतात त्यांनाच माहित. पण असे झाल्यास आपण काहीच करू शकत नाहीत कारण हे अप्प भारतातून ऑपेरेट होत नाही आणि भारत सरकार याला मान्य करत नाही ज्यामुळे आपले पासे बुडणार कि नाही हे ते अप्पच ठरवेल.

 असे एका मिनिटात अंदाज सांगून पैसे कमावता आले असते तर आज भारतातला प्रत्येकजण श्रीमंत झाला असता या अप्प स्वतःला चांगले दाखवण्यासाठी अनेक प्रलोभानीय जाहिराती दाखऊन आणि  युट्युब चेनेलना विकत घेऊन मार्केटमध्ये पैसा लुटत आहेत  आणि त्यांच्यावर विश्वास करणारे सबस्क्राईबर स्वतःचा पैसा गमावत आहेत 

BINOMO , OLMP TRADE,BHARAT OPTION अशी अनेक अप्प आपल्याला गुगल प्ले वर मिळतील यांपासून दूर राहणेच योग्य आहे.

आपल्याला काय वाटते खाली कमेंट करून सांगा आपल्याला आणखी माहिती घ्यायची असेल तर मला कमेंट मध्ये लिहा मी आपल्याला उत्तर नक्की देईन .

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म